•फसवणूक करणारे अनेकदा विविध बहाण्याने ग्राहकांशी संपर्क साधतात आणि ग्राहकांच्या फोनवरील ॲप्सचा वापर करून क्विक रिस्पॉन्स (QR) कोड स्कॅन करण्यासाठी फसवणूक करतात.
•असे QR कोड स्कॅन करून ग्राहक नकळत फसवणूक करणाऱ्यांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याचा अधिकार देऊ शकतात.
•कोणत्याही पेमेंट ॲपचा वापर करून QR कोड स्कॅन करताना सावधगिरी बाळगा. QR कोडमध्ये विशिष्ट खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी खात्याचा तपशील जोडलेला असतो.
•पैसे मिळवण्यासाठी कधीही QR कोड स्कॅन करू नका. पैसे मिळण्याशी संबंधित व्यवहारांना बारकोड / QR कोड स्कॅन करण्याची किंवा मोबाइल बँकिंग PIN (m-PIN), पासवर्ड इत्यादींची आवश्यकता नसते.